गावातील विकास कामांना गावकऱ्यांनी सहकार्य करावे – राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर

जालना : मतदारसंघातील प्रत्येक गावात रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यासारख्या भौतिक सुविधा उपलब्ध करुन देत गावकऱ्यांच्या असलेल्या समस्या सोडवून गावात विकास कामे करण्यावर भर देण्यात येत असुन विकास कामे करत असताना या कामांना गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत गुंडेवाडी, जामवाडी, वंजार उम्रद येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री श्री.खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी गुंडेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात गावकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

राज्यमंत्री श्री.खोतकर म्हणाले की, या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. परंतू रस्त्याच्या होणाऱ्या कामामुळे रस्त्याचा दर्जा सुधारणार असुन गावे शहराशी जोडली जाणार आहेत. या परिसरातील रस्त्याच्या कामांना यापूर्वीही निधी मंजूर करण्यात आला असुन गावात सभागृहाच्या उभारणीसाठी 5 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सांगत गावकऱ्यांच्या असलेल्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्राधान्य देण्यात आले असल्याचेही राज्यमंत्री श्री.खोतकर यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा सहज आणि सोपा व्यवसाय असुन समाजातील प्रत्येक शेतकऱ्याला पशुपालन व्यवसाय करता यावा यादृष्टीकोनातून दुधाळ जनावरे वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न केल्याने जालना जिल्ह्यात हा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यासाठी शासनाने मंजुरी दिली. या योजनेंतर्गत सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना गाई, म्हशी 50 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येत असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहनही राज्यमंत्री श्री.खोतकर यांनी यावेळी केले.

निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. कमी पाणी, अल्प गुंतवणूक व कमी कालावधीमध्ये भरघोस उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून रेशीम उद्योगाकडे पाहिले जाते. एका एकरामध्ये दरवर्षी किमान पाच ते सहा पीक घेता येतात. मनरेगाच्या माध्यमातुन रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येते. आजघडीला रेशीम आळी (चोकी) उत्पादनही करण्यात येत असुन या चोकीपासून केवळ 15 दिवसांच्या आत कोषांची निर्मिती होऊन कोष बाजारात विक्रीसाठी तयार होतो. यापूर्वी कोषांच्या विक्रीसाठी बेंगलोर येथे जावे लागत होते. परंतू सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यातील पहिले रेशीम कोष खरेदी विक्रीची बाजारपेठ जालन्यात उभी करण्यास शासनाने मान्यता दिली असुन प्रायोगिक तत्वावरील रेशीम कोष खरेदी केंद्राचा शुभारंभही करण्यात आला आहे. रेशीम कोष विक्रीचा प्रश्नही आता या रेशीम विक्री खरेदी केंद्राच्या माध्यमातून सुटला असुन जिल्ह्यासह राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याची गरज असुन तरुण शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही राज्यमंत्री श्री.खोतकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भास्कर आंबेकर यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

कडवंची व परिसराच्या अधिकाधिक विकासासाठी प्रयत्नशिल – राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर

जालना : कडवंची व परिसरात द्राक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. प्रगतीच्या दिशेन वाटचाल करणारा व राज्यासाठी आदर्श असलेला हा भाग असुन या भागाच्या अधिकाधिक विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले.

4 कोटी 4 लक्ष रुपयांच्या थार, नंदापूर,, अंभोरेवाडी, कडवंची रस्त्याची सुधारणा करण्याच्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री श्री.खोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भास्करराव आंबेकर,ए.जे. बोराडे, पंडितराव भुतेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यमंत्री श्री.खोतकर म्हणाले की, कडवंची व परिसर हा द्राक्ष उत्पादनाच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशेने वेगाने झेपावत आहे. राज्यासमोर या भागाने एक वेगळा आदर्श निर्माण केला असुन या भागातील शेतकऱ्यांना द्राक्ष उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोई-सुविधा पुरविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. द्राक्ष लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक असणारा स्प्रे पंपींग मशिनसाठी आपण सिद्धीविनायक ट्रस्ट यांना पंपीग मशिन पुरवण्याबाबत पत्र देण्यात आले असुन ते लवकरच प्राप्त होणार आहे. या स्प्रे पंपींग मशिनचा उपयोग या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. द्राक्ष पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक असलेल्या तपासण्या करण्यासाठी शेतकऱ्यांना नासिक येथे जावे लागते. ही सोय येथेच उपलब्ध व्हावी यासाठी या परिसरात एक स्वतंत्र अशा प्रयोगशाळेच्या उभारणीबरोबरच हवामानाचा अंदाज येण्यासाठी रामनगर येथे केंद्र उभारणीसाठीही प्रयत्न करण्यात येत असल्याचे राज्यमंत्री श्री.खोतकर यांनी यावेळी सांगितले.

या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे सांगत समृद्धी महामार्गामध्ये जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन या गावात जलसंधारणाची अनेकविध कामेही पूर्ण करण्यात आली असल्याचे सांगून या भागातील रस्ते, वीज, पाणी यासारख्या गरजांच्या असलेल्या समस्या टप्प्या-टप्प्याने सोडविण्यात येतील, असेही राज्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून चार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राहील याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान 2 कोटी 73 लक्ष रुपयांच्या गुंडेवाडी, जामवाडी, वंजार उम्रद रस्त्याची सुधारणा करण्याचा कामाचा शुभारंभही राज्यमंत्री श्री.खोतकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भास्कर आंबेकर यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्या ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2018 ABNNI TV. All rights reserved."The S Amarsinh Broadcasting News Network & Investigation’s” www.abnnitv.asia web TV is Marathi+ Hindi+ English language web TV Channel. willing to cover all rural Asia. The authors are solely responsible for the content of their news, articles. By publishing an article or case, www.abnnitv.asia or its directors/editors do not endorse the views of the author. The author is solely responsible for any legal action/consequences arising due to and from any article, case, image or any other information submitted by the author to www.abnnitv.asia विविध सदरांत प्रसिध्द झालेला मजकूर ही त्या त्या लेखकाची मते आहेत. त्या मतांशी www.abnnitv.asia सहमत असेलच असे नाही. व्यक्तींची नावे, आकडेवारी , जुने संदर्भ यांच्या अचूकतेसाठी मूळ स्रोतांद्वारे माहिती घेणे योग्य आहे.