नरेंद्र मोदींचा प्रसिध्दीचा हव्यास, भाजपा सरकारांचा खोटेपणा आणि प्रशासकीय लबाडीत वैकुंठी जाटवचा हकनाक बळी

वैकुंठी जाटव ही राजस्थानातील साठ वर्षीय केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा, म्हणून सरकारी कार्यालयात चकरा मारून थकली. ना तिच्या घरावर छत आहे, ना तिच्या घरात गॅस आहे. पण उज्ज्वला गॅस योजनेची लाभार्थी म्हणून ती पंतप्रधानांच्या जनसंवाद कार्यक्रमात ती बसली होती. घरावर छत देण्याच्या बहाण्याने तिला कार्यक्रमात आणण्यात आलं होतं. कार्यक्रमातून घरी परतताना बसमध्ये बसायला जात असताना, एका वाहन ठोकरीत तिचा मृत्यू झाला आणि आश्चर्याची बाब म्हणजे थेट मुख्यमत्री स्तरावरून तिच्या कुटुंबाला तातडीने मदत देण्यासाठी सूत्रे हालली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रसिध्दीचा हव्यास, भाजपा सरकारांचा खोटेपणा आणि प्रशासकीय लबाडीत वैकुंठी जाटवचा हकनाक बळी गेला.

वैकुंठी जाटव यांच्या पतीचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं. आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची. एक दत्तकपुत्र व सुनेसोबत त्या राहत होत्या. राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील कठुमर तालुक्यातील समूची हे त्यांचं गाव. घरावर छत टाकून मिळावं, शौचालय बांधून मिळावं आणि गॅस कनेक्शन मिळावं, म्हणून गावच्या सरपंच आणि ग्रामसचिवाकडे चकरा मारून वैकुंठी हतबल झाल्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्या लाभार्थी नव्हत्या, हे उघड झाल्यावर सरकारी यंत्रणांचं धाबं दणाणलं. हे प्रकरण दाबण्याची जबाबदारी खाद्यमंत्री बाबुलाल वर्मा आणि स्थानिक आमदार मंगल राम यांनी घेतली. रात्री अकरा वाजता या दोघांनी गावात जाऊन वैकुंठीच्या कुटुंबाला अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.

पण समूची ग्रामस्थ संतप्त होते. लाभार्थी नसतानाही वैकुंठीला जनसंवाद कार्यक्रमाला का नेण्यात आलं, असा जाब विचारू लागले. त्यांना पोलिस आणि प्रशासनाने दाबलं. रात्री बारा वाजता दोन्ही नेत्यांनी वैकुंठीच्या मुलाने, सुनेने तोंड उघडू नये, म्हणून दहा लाखांची मदत जाहिर केली. चेकही मागवला गेला. पण कोणाचे खाते नव्हते. अर्थात, ते नंतर उघडूनही चेक वठवता आला असता, पण चोराच्या मनात चांदणं, तसं रातोरात पाच लाख रोख रक्कमेची व्यवस्था करण्यात आली. उजाडायच्या आधीच प्रशासन आणि पोलिसांच्या दबावाने वैकुंठीचा अंत्यसंस्कारही घडवूनच दोन्ही नेते परतले.

आता, वैकुंठीला उज्ज्वला गॅस योजनेची लाभार्थी ठरवण्यासाठी राजस्थानातील भाजपाच्या वसुंधरा सरकारची केविलवाणी धडपड सुरू आहे. समूची गावापासून दोन किलोमीटरवरच्या खेरली गावातील देवऋषी गॅस एजन्सीकडे वैकुंठीची नोंद नाही. मग प्रशासन म्हणू लागलं, तसई गावातील अंजली गॅस एजन्सीकडे तिची नोंद आहे. प्रशासनाने मिडियाला वैकुंठीच्या घरातली गॅस शेगडीही दाखवली. ती हिंदुस्थान पेट्रोलियमची होती. पण अंजली गॅस एजन्सी भारत पेट्रोलियमची आहे. शिवाय, तसई गाव वैकुंठीच्या गावापासून २५ किमी लांब आहे. जिथे वैकुंठीचं गॅस कनेक्शन असणं अतार्किक आहे. वैकुंठीच्या मुलाने व सुनेने आधी कॅमेर्‍यासमोर सांगितलंय की त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही.

या घटनेतील सत्यासत्यता चर्चेचा किंवा उलटतपासणीचा विषय होऊही शकतो, पण एका रस्ते अपघातातील मृत्यूसाठी सरकार इतक्या तातडीने मदत कधीपासून करू लागलं, का सरकार इतकं धडपडतंय, काय दडपू पाहतंय राजस्थानातील भाजपा सरकार!!! राजस्थानातील अनेक शहीद परिवार गेल्या तीन महिन्यांपासून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर वैकुंठी प्रकरणात राजस्थान सरकारने दाखवलेली तत्परता निश्चितच संशयास्पद आहे.

(” द वायर ” वरील हिंदी बातमीचं मुक्त भाषांतर)

 

credits – कायद्याने वागा लोकचळवळ – Kaydyane Waga
By Sagar Borse FB wall

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2018 ABNNI TV. All rights reserved."The S Amarsinh Broadcasting News Network & Investigation’s” www.abnnitv.asia web TV is Marathi+ Hindi+ English language web TV Channel. willing to cover all rural Asia. The authors are solely responsible for the content of their news, articles. By publishing an article or case, www.abnnitv.asia or its directors/editors do not endorse the views of the author. The author is solely responsible for any legal action/consequences arising due to and from any article, case, image or any other information submitted by the author to www.abnnitv.asia विविध सदरांत प्रसिध्द झालेला मजकूर ही त्या त्या लेखकाची मते आहेत. त्या मतांशी www.abnnitv.asia सहमत असेलच असे नाही. व्यक्तींची नावे, आकडेवारी , जुने संदर्भ यांच्या अचूकतेसाठी मूळ स्रोतांद्वारे माहिती घेणे योग्य आहे.