रामलिंग महात्म्य प्रदर्शन सोहळा

मा. श्री. गणपतराव जाधव यांच्या हस्ते “श्री रामलिंग महात्म्य” या लघु चित्रपटाचे प्रदर्शन

निप्पानी दि. १६/०९/२०१८  : जवळील शिप्पूर या गावातील प्राचिन रामलिंग मंदिराच्या आख्यायिके वर आधारित अमर स्वराज्य रुरल डेव्हलपमेंट रिसर्च एंड इन्फर्मेशन इन्स्टीट्युट निर्मित “श्री रामलिंग महात्म्य” या लघु चित्रपटाचे प्रदर्शन चेअरमन श्री प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मुंबई येथील इन्कमटॅक्स विभागाचे निवृत्त सुपरिटेनडनट मा श्री गणपतराव जाधव यांच्या हस्ते झाले.

या लघु चित्रपटाचे दिग्दर्शक अमरसिंह राजे यांनी याच्या निर्मिती करताना ग्रामीण पर्यटन मंत्रालय भारत सरकारने लागू केलेल्या २००२ संकृती व पर्यटन मार्गदर्शिके ला प्रदान उपक्रम म्हणून केली असल्याचे सांगितले. या प्रसंगी बोलताना मराठा क्रांती मोर्चाच्या प्रद्या जाधव यांनी महिलांना आपल्या सुप्त गुणांनाच्या वाव देण्याचा आणि सबला म्हणून जगण्याचा सल्ला दिला. स्त्रियांनी स्व संरक्षण कला शिकणे काळाची गरज आहे. स्त्रियांच्या मुळे घर सुधारते, त्यामुळे आज मुलींनी डॉक्टर इंजिनियर होण्या पेक्षा प्रसारमाध्यम क्षेत्रात, पत्रकरिता क्षेत्रात आपला टक्का वाढविणे गरजेचे आहे असेही सांगितले.

 

abnnitv रामलिंग महात्म्य लघुपट प्रदर्शन सोहळायाचे प्रमुख अतिथी मा श्री गणपतराव जाधव यांचा सत्कार करताना शिप्पूर ग्रामपंचायत चे चेअरमन श्री प्रकाश पाटील
रामलिंग महात्म्य लघुपट प्रदर्शन सोहळायाचे प्रमुख अतिथी मा श्री गणपतराव जाधव यांचा सत्कार करताना शिप्पूर ग्रामपंचायत चे चेअरमन श्री प्रकाश पाटील व मान्यवर 

ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक कलाकारांचा सत्कार उपस्थित मान्यवरांनी केला. तर दिग्दर्शक अमरसिंह राजे यांचा सत्कार ग्रामपंचायत चेअरमन श्री प्रकाश पाटील यांनी शाल व श्री फळ देऊन केला.

या कार्यक्रमाला फायनान्सर उमाजीराव पाटील, संस्थेचे संचालक शहाजी पाटील, सौ. शैलाजाराजे पाटील, माजी चेअरमन दत्तात्रय खराडे, ग्रा.सदस्य अविनाश सुतार, सर्जेराव पाटील, मिमिक्रीकिंग योगेश जाधव, रामचंद्र पाटील(बाळासो), DOP किरण जेजुरकर, संगीतकार चंद्रशेखर जनवाडे, अभिनेता पी बाळराजे, कलाकार आनंद निंबाळकर, अजय अहिर, स्वाती कोळी, पवन गुरव, सुरज हवालदार, शाहीर प्रदीप सुतार, राजेश गुरव, पुण्याचे विठ्ठल पांगारकर, प्रशांत पाटील, सह दिग्दर्शक मजले, रुपाली कोळी,  यांच्या सह गावातील प्रतिष्टीत नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. de

abnnitv रामलिंग महात्म्य लघुपट प्रदर्शन सोहळायाचे प्रमुख अतिथी मा श्री गणपतराव जाधव यांचा सत्कार करताना शिप्पूर ग्रामपंचायत चे चेअरमन श्री प्रकाश पाटील
श्री रामलिंग महात्म्य लघुपट प्रदर्शन सोहळायात दिग्दर्शक व निर्माता अमरसिंह राजे यांचा शाल व श्रीफळ देऊन शिप्पूर गावाच्या वतीने सत्कार करताना शिप्पूर ग्रामपंचायत चे चेअरमन श्री प्रकाश पाटील व इतर मान्यवर 

चंदन गिरी देवस्थान समिती व क्रांती तरुण मंडळाचे कार्यकर्ते व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले.

 

इतर क्षणचित्रे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2018 ABNNI TV. All rights reserved."The S Amarsinh Broadcasting News Network & Investigation’s” www.abnnitv.asia web TV is Marathi+ Hindi+ English language web TV Channel. willing to cover all rural Asia. The authors are solely responsible for the content of their news, articles. By publishing an article or case, www.abnnitv.asia or its directors/editors do not endorse the views of the author. The author is solely responsible for any legal action/consequences arising due to and from any article, case, image or any other information submitted by the author to www.abnnitv.asia विविध सदरांत प्रसिध्द झालेला मजकूर ही त्या त्या लेखकाची मते आहेत. त्या मतांशी www.abnnitv.asia सहमत असेलच असे नाही. व्यक्तींची नावे, आकडेवारी , जुने संदर्भ यांच्या अचूकतेसाठी मूळ स्रोतांद्वारे माहिती घेणे योग्य आहे.